श्री दत्तावधूत क्षेत्र निखरे - राजापूर मठातील

उपक्रम

अनाथाश्रमात अन्नधान्य वाटप

                     श्री दत्तावधूत क्षेत्र निखरे – राजापूर मठाचे मठाधिपती सदगुरु श्री स्वामी माऊली गेली अनेक वर्षे अनाथाश्रमात अन्नधान्य दान करत आहेत. महादत्ताभिषेकाच्या माध्यमातून जमणारी धनराशीतुन सामाजिक उपक्रम राबविले जातात. चांगल्या दर्जाचे तांदूळ, कडधान्य, धान्य, डाळी, तेल, मसाले, वस्त्र स्वतः सदगुरु माऊली खरेदी करून अनाथाश्रमांना भेट देऊन मदतीचा हात देत असतात. विशेष करून दिवाळीच्या पहिल्या दिवशी सकाळीच मठात बनवलेला दिवाळीचा फराळ अनाथाश्रमातील सर्व लोकांना सदगुरु माऊली सेवेकऱ्यांसोबत वाटतात. माऊली म्हणतात ” दान त्यालाच करा ज्याला त्याची गरज आहे “

वृद्धाश्रमात अन्नधान्य वाटप

                   सदगुरु श्री स्वामी माऊली वृद्धाश्रमातील आजी आजोबांना गुरुपौर्णिमा, श्री दत्तजयंतीला, श्री स्वामी प्रकट दिन, सदगुरु श्री रामचंद्र महाराज महासमाधी सोहळ्याच्या दिवशी विशेष अन्नदान करतात. त्यांना अन्नधान्याचे वाटप करतात. अन्नदानासारखे दान नाही, दान अशांना करा ज्यांना त्या दानाची खरी गरज आहे.

मतिमंद मुलांच्या शाळेत अन्नधान्य वाटप

                 सदगुरु श्री स्वामी माऊलींनी यावर्षीच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मतिमंद निवासी शाळेतील विध्यार्थ्यांसाठी खास मोहीम हाती घेतली. त्यांना दरमहिन्याला लागणारे पौष्टिक आहार, अन्नधान्य तसेच त्यांच्या शैक्षणिक साहित्याची मदत श्री दत्तावधूत क्षेत्र निखरे – राजापूर मठाच्या वतीने केली जात आहे. अनेक भक्तांच्या मदतीने हे कार्य यशस्वी पार पडत आहे. माऊलींनी सर्व भक्तांना खास आग्रह केला आणि भक्तांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला. माऊलींचे हे कार्य उत्तरोत्तर वेगाने पसरत आहे.

विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

               ग्रामीण भागातील पालकांची परिस्थिती खूपच अडचणीची असते. महागाई एवढी वाढली आहे की त्यामुळे इच्छा असूनही मुलांना शिकवणे पालकांना खूप कठीण जाते. गेली पाच वर्ष सदगुरु माऊली अनेक शाळेंना प्रत्यक्ष भेट देऊन विध्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे व उपयोगी शैक्षणिक साहित्य वाटप करतात. हे साहित्य दरवर्षी वर्षातून दोन वेळा वाटले जाते. यामुळे विध्यार्थी खुश असतातच त्यांच्या सोबत शिक्षक व पालक वर्ग आनंदी असतो. या उपक्रमात शिक्षक स्वतः आग्रही असतात. यावर्षापासून विध्यार्थ्यांच्या कलेला, त्यांच्या गुणांना वाव मिळण्यासाठी श्री दत्तावधूत क्षेत्र निखरे – राजापूर मठाच्यावतीने विशेष उपक्रम राबविले जात आहेत.