01
विश्वस्थ संस्था रजिस्ट्रेशन क्रमांक
02
विश्वस्थ संस्था रजिस्ट्रेशन वर्ष
वर्ष २००३
03
विश्वस्थ संस्था संस्थापक
सदगुरु श्री रामचंद्र महाराज
II ॐ ॐकारा गुरुदेव दत्त II
श्री दत्तावधूत पादुका
सदगुरु श्री स्वामी माऊली यांनी श्री दत्तावधूत पादुकांची स्थापना केली.
मराठीतून वाचा
श्री दत्तावधूत क्षेत्र निखरे – राजापूर मठाबद्दलची संपूर्ण माहिती, गुरुपरंपरा , कार्यक्रम, उपक्रम व भविष्यातील मठाची वाटचाल मराठी भाषेतून वाचण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
हिंदी में पढ़ें
श्री दत्तावधूत क्षेत्र निखरे – राजापूर मठ, गुरु परंपरा, कार्यक्रमों, गतिविधियों और मठ की भविष्य की दिशा के बारे में हिंदी भाषा में पूरी जानकारी पढ़ने के लिए नीचे दिए गए बटन पर क्लिक करें।
Read in English
Click on the below button to read complete information about Shri Dattavadhoot Kshetra Nikhare – Rajapur Math, Guruparampara, programs, activities and future progress of the Math in English language.
दूरचित्रवाणी
सदगुरू अभंग, प्रवचने आणि कार्यक्रम














































एका नामाने घराचेच मंदिर बनवा !
श्री अनघादत्तगुरूंचे अतिदुर्लभ जागृत स्थान – श्री दत्तावधूत मठ, निखरे - राजापूर
भारतभूमी ही संतांची, ऋषींची, आणि देवतेंची भूमी आहे. परंतु काही थोर तपस्वी आणि जागृत स्थाने अशी असतात, जिथे साक्षात देवत्व प्रकट झालेले असते. असेच एक अद्वितीय, जागृत आणि दुर्मिळ स्थान म्हणजे श्री दत्तावधूत मठ, निखरे – राजापूर. या पुण्यभूमीवर साक्षात श्री अनघादत्तगुरूंची मूर्तिबद्ध स्थापना झाली आहे.
या जागृत मूर्तीची स्थापना सद्गुरु श्री स्वामी माऊली यांनी अत्यंत पवित्र संकल्पाने आणि दैवी आज्ञेने केली. श्री दत्तमहाराजांचे हे एकमुखी, द्विभुज रूप कृष्णशिलेत घडवले गेले असून, हे संपूर्ण भारतात अत्यंत दुर्मिळ आणि अनुपम मानले जाते.
या मूर्तीमध्ये महाविष्णूचे तेज, भगवान शंकरांचे शांत रूप, ब्रह्मदेवाचे वैभव, आणि दत्तात्रेयांची करुणा एकत्रित प्रकट झालेली आहे. प्रथमदर्शनी शंकररूप, काही क्षणांत ब्रह्मरूप, आणि नंतर परम सौम्य दत्तमूर्ती – असा अनुभव असंख्य भक्तांच्या हृदयात उमटतो.
सोबतच या मूळ स्थळी उभ्या आहेत आई अनघा देवी, एकमुखी, द्विभुज, सात फूट उंच कृष्णशिलेत कोरलेल्या, ज्या परामाया, न्यायदेवता आणि दिव्य शक्तीचे मूर्त स्वरूप आहेत. त्यांच्या मुकुटावर नाग आहे, चंद्रसूर्य कोरलेले आहेत, आणि तराजूसह अनेक शक्तिचिन्हांनी युक्त मूर्ती तीव्र आध्यात्मिक स्पंदन देणारी आहे.
हे स्थळ केवळ एक दर्शनस्थळ नाही, तर हे जीवन बदलणारे, भक्तांना साक्षात्कार देणारे, आणि आत्मा जागवणारे तिर्थक्षेत्र आहे. येथील प्रत्येक भक्तास ही मूर्ती आपल्याशी बोलते, हसते, प्रश्न विचारते, आणि अंतर्मनात एकच संदेश देते –
“मी इथेच आहे.”
हातात काम मुखात नाम घेत प्रपंचातून परमार्थ साधा !
प्रश्न तुमचे उत्तर स्वामींचे
समस्येंच्या निवारणासाठी आजच संपर्क करा.
जिथे मानवाचे प्रयत्न संपतात, तिथून चालू होते स्वामींचे कार्य !
प्रश्न तुमचे उत्तर स्वामींचे यामध्ये आपल्या प्रापंचिक व पारमार्थिक समस्या मांडण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.