श्री दत्तावधूत क्षेत्र निखरे - राजापूर

चला जाणून घेऊया श्री दत्तावधूत क्षेत्र निखरे - राजापूर मठाबद्दल !

सदगुरु परंपरा

श्री दत्तावधूत क्षेत्र निखरे - राजापूर मठाची गुरुपरंपरा...

उत्सव

दत्तावधूत क्षेत्र निखरे - राजापूर मठातील साजरे होणारे वार्षिक उत्सव ...

उपक्रम

श्री दत्तावधूत क्षेत्र निखरे - राजापूर मठात राबविले जाणारे उपक्रम...

स्वामी कार्य

श्री दत्तावधूत क्षेत्र निखरे - राजापूर मठाचे भविष्यातील सामाजिक कार्य...

सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत !

श्री दत्तावधूत क्षेत्र निखरे - राजापूर

नवीन मठाची वास्तू

                  निसर्गाच्या कुशीत वसलेले निखरे हे छोटेसे खेडेगाव. चारही बाजूंनी डोंगर असणारे कोकण प्रांतात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात राजापूर शहरापासून अठरा किलोमीटरवर असणारे हे गांव. राजापूरहून निघाल्यावर सुरुवातीलाच गरम पाण्याचा झरा लागतो, जेथे अविरत निरंतर गरम पाणी वहात असते. तेथेच आई महालक्ष्मीचे सुंदर मंदिर आहे आणि एक किलोमीटरच्या आत सद्गुरू श्री स्वामी समर्थ मठ देखील आहे. राजापूरची प्रसिद्ध गंगा याच गावात एका टेकडीवर येते. हे पवित्र स्थान देखील याच रस्त्याला आहे. तेथून पुढे निघालात की अवघ्या सात किलोमीटरच्या अंतरावर पांगरे म्हणून गांव लागते. हे सदगुरु श्री शिवानंद स्वामी महाराज यांचे स्थान आहे. येथेच त्यांची समाधी आहे. हे सदगुरु वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी यांचे शिष्य होय. समाधीपासून जवळच हरिहरेश्वराचे प्राचीन जागृत देवस्थान आहे. रस्त्यालगतच आई निनादेवीचे स्थान आहे. त्याच रस्त्याने पुढे आल्यावर राजापूर रेल्वे स्टेशन अवघ्या पाच किलोमीटरवर आहे. राजापूर रेल्वे स्टेशन पासून तीन किलोमीटरवर निखरे गांव आहे. गावाच्या मधोमध असणाऱ्या छोट्याशा टेकडीवर श्री दत्तावधूत क्षेत्र आहे.
                    सदगुरु श्री रामचंद्र महाराज यांनी घराचेच मंदिर बनव असा सदगुरु श्री स्वामी यांना आदेश दिला. पूर्वार्जित असणारे घर सदगुरु श्री रामचंद्र महाराज यांचे हे जन्मस्थळ आहे. सदगुरु महाराजांच्या आदेशाने याच घरात स्वामी कार्य चालू झाले आणि हळूहळू या घरातच अध्यात्मिक भक्ती केंद्र निर्माण झाले. अनेक भाविकांना अध्यात्मिक मार्गदर्शन होत होते. प्रापंचिक विवंचना निवारणाचे कार्य चालू झाले. त्यामुळे श्रीगुरु दत्तात्रेयांच्या भक्ती मार्गात लाखो भाविकांना आणता आले. आज या घराच्याच जागेवर मंदिर उभे आहे. अनेक पारायणे सदगुरु महाराजांच्या आशीर्वादाने भक्तांकडून केली गेली. अनेक साधकांनी साधना केल्या. सदगुरु श्री रामचंद्र महाराजांची आणि सदगुरु श्री स्वामी यांची तपोभूमी आहे. या जागेत अनेक उपासना, तपश्चर्या केल्या. इथेच सदगुरु श्री रामचंद्र महाराजांचा संसारातून परमार्थ घडला. याच ठिकाणी महाराजांनी मोक्ष साधला. याच ठिकाणी जलसमाधी घेतली आणि मठाच्या शेजारीच भूगर्भ समाधी बांधण्यात आली.

                   सदगुरु श्री रामचंद्र महाराज यांनी श्री स्वामी समर्थ मठ निखरे – राजापूर या मठाची स्थापना या घरातच केली. त्यांच्या पूजेचे आणि साधनेचे स्थान महाराजांनी निर्माण केले आणि तेथेच आज गाभारा आहे. पूर्वी हे घर मातीच्या भिंती आणि कौलांचे छप्पर असणारे होते. साधारण दोनशे वर्षापूर्वीचे घर दिमाखात उभे होते. महाराजांना आणि त्यांच्या परिवाराला घरातून आणि गावातून पळवून लावण्यासाठी त्यांच्या घरभावकीतील महाराजांच्या मोठ्या भावाच्या मुलांनी भर पावसात छपरावर चढून कौले फोडली. त्यामुळे मातीच्या भिंती भिजून एका बाजूने अर्धे घर कोसळून पडले. परंतु महाराज ज्या बाजूला रहात होते त्या ठिकाणी अजिबात काहीच त्रास झाला नाही. अर्धी बाजू आपोआप वरच्यावर सावरून उभी राहिली. देव तारी त्याला कोण मारी याचा परिचय सदगुरु श्री दत्तात्रेयांनी दिला. सन 2015 – 16 साली चक्रीवादळ झाले. मठाच्या दोन्ही बाजूला दोन मोठी विशाल झाडे कोसळली. मात्र मठाला जराही धक्का लागला नाही. वास्तूला मोठा धोका निर्माण होऊ नये म्हणून त्या जागेवर आता स्वामी यांनी अनेक भाविकांच्या वस्तूरुपाचे मदतीने चिऱ्याचे दगडी बांधकाम करून तीन छपरे असणारे शिखरावर कलश स्थापित मठाचा जीर्णोद्धार केलेला आहे. सदगुरु श्री रामचंद्र महाराज यांनी या मठाची ट्रस्ट नोंदणी केली आणि त्याची नियमावली देखील महाराजांनीच लिहिली. मठाचे सार्वजनिक विश्वस्त संस्था नोंदणी क्रमांक रत्नागिरी 1104 ए असा आहे. या मठाद्वारे अनेक सार्वजनिक उपक्रम हाती घेतले जातात. अनेक लोकांना मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार, मार्गदर्शन, प्रवचन असे अनेक उपक्रम राबविले जातात. सदगुरु श्री स्वामी यांना हा मठ अशा पद्धतीने बांधायचा आहे, ज्यात सदगुरु श्री दत्तात्रेयांचे सर्व अवतार, महाविष्णूचे सर्व अवतार, महादेवाचे सर्व अवतार, शक्ती मातेचे सर्व अवतार असणारे विष्णू पीठ, शिव पीठ, शक्ती पीठ आणि गुरु पीठ एकत्रित असणारे बावन्न फूट उंचीचे समाधी मंदिर उभारण्याचा संकल्प आहे. त्याचबरोबर अत्याधुनिक हाॅस्पिटल निर्माण करायचे आहे, जेथे मोफत वैद्यकीय उपचार केले जातील. आपली संस्कृती, आपला धर्म सर्वांना कळण्यासाठी वेद शाळा निर्माण करायची आहे. अशी अनेक स्वप्न उराशी बाळगून श्री स्वामी घराचेच मंदिर बनवा, ही शिकवण घरोघरी राबवत आपला प्रवास अविरत करत आहेत.

 
जुना मठाची वास्तू

” दया, क्षमा, शांती या तीन सूत्रांनी आयुष्य बहरून जाते आणि भक्ती, श्रद्धा, विश्वास या तीन गुणांनी जीवन धन्य होऊन जाते “

अनुभवाचे बोल

भक्तांचे अनुभव आणि त्यांची मते.

" सतत नामस्मरण केल्याने त्याचे चांगलेच प्रत्यय येतात. संकटे जरी आली तरी त्याची तीव्रता कमी असते. मुंबईत स्वतःचे निवासस्थान घेणे, हे केवळ नामस्मरणामुळेच शक्य झाले. असे अनेक चमत्कार वेळोवेळी होत असतात. फक्त त्या चमत्काराने हुरळून जाऊ नये. आपण फक्त नामस्मरण करत रहावे. आपली कामे करत रहावी, यश नक्की मिळणार, आपली सर्व काळजी सदगुरु घेतात. आपला विश्वास मात्र दृढ हवा. त्याच्यात किंतू, परंतु असता कामा नये."
श्री संतोष गुणाजी आचरेकर
२३ वर्षांचा सहवास
" आयुष्याच्या एका वळणावर समोर फक्त अंधारच दिसत होता. त्या वेळी स्वामी माझ्या आयुष्यात आले आणि त्यांनी मला त्यातून बाहेरच काढलं नाही तर योग्य मार्गदर्शन करुन यशाची चव चाखायला लावली. नामस्मरण करीत गुरू सेवेत आणि जनसेवेत आयुष्याचे सोने करण्याचा अमुल्य गुरुमंत्र दिला. आयुष्य जगण्याची एक नवीन दृष्टी स्वामींनी दिली. त्या गुरू माऊलीला कोटी कोटी प्रणाम. "
डॉ. जगदिश्वर विठ्ठल तेंडोलकर
२२ वर्षांचा सहवास
" जेव्हापासून सदगुरु श्री स्वामींची आणि माझी भेट झाली, तेव्हापासून जीवनच बदलून गेले. आमच्या कागल येथील दत्त मठातील पादुका मी दुसर्‍यांना द्यायला निघालेलो. परंतु श्री स्वामींनी मला पादुकांचे महत्त्व पटवून दिले व सांगितले, जे पादुका मागतात त्यांच्या घराण्यात त्या जायच्या असत्या तर त्या तुमच्याकडे आल्याच नसत्या. खरेतर पादुकांसमोर माझ्याकडून दिवाबत्ती लावली तर ती पेटत नव्हती. मात्र इतरांकडून पेटायची. श्री स्वामींनी सांगितल्यानुसार मी पादुकांसमोर क्षमा मागितली. तेव्हापासून आजतागायत नियमित दिवाबत्ती चालू आहे. त्यांच्याच आशीर्वादाने मला रोजगार मिळाला. आज मी श्री स्वामींच्या आशीर्वादाने सुखी समाधानी आहे. "
प्रणव शशिकांत कुळकर्णी
१८ वर्षांचा सहवास